मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी - उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे

 मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

20 ऑगस्टपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी

-         उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे

लातूरदि. 07 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. पात्र नवमतदारांची मतदार नोंदणी करून घेणे आणि मतदार यादी अद्यायवत तयार करणे, या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 1 जुलै2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण दुसरा कार्यक्रमानुसार 6 ऑगस्ट रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून 20 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या कालावधीत नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येईल, असे लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी कळविले आहे.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्यासाठी शनिवार, 10 ऑगस्ट2024 आणि रविवार 11 ऑगस्ट 2024, तसेच शनिवार, 17 ऑगस्ट 2024 आणि रविवार, 18 ऑगस्ट 2024 या चार दिवशी 235-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरादिवशी संबंधित यादीभागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे त्यांच्या अधिनस्त यादी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील  सर्व नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त पात्र मतदारांनी या कालावधीत मतदार नोंदणी करावी, असे अवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा