क्रीडा दिनानिमित्त गुरुवारी विविध स्पर्धांचे आयोजन
क्रीडा दिनानिमित्त गुरुवारी विविध स्पर्धांचे आयोजन
लातूर, दि.26 (जिमाका) : महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा दिनांक 29 ऑगस्ट हा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रचार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळांचे महत्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश जावा, युवक - युवतीमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी विविध उपक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत.
या निमित्ताने 29 ऑगस्ट रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटासाठी 100 मीटर धावणे, योगासन, कॅरम, बुध्दीबळ, आर्मरेसलींग, फन गेम. 40 वर्षे ते 60 वर्षे वयोगटासाठी 50 मीटर धावणे, 300 मी. धावणे, 1 कि.मी. चालणे, खो-खो, योगासन, बुध्दीबळ, पुशअप इ. 60 वर्षेवरील वयोगटासाठी 300 मीटर जलद चालणे, योगासन, 1 कि.मी. चालणे बुध्दीबळ इ.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी 50 मी. धावणे , योगासन, लांबउडी, फनीगेम्स , इयत्ता सहावी ते आठवीसाठी 50 मी. धावणे, रिले , 300 मी. धावणे, फुटबॉल, खो-खो, फनी गेम्स , इयत्ता नववी ते बारावी 50 मी. धावणे , रिले, 600 मी. धावणे, फुटबॉल, खो-खो, पुशअप, सिटअप, फनी गेम्स आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामध्ये लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू , युवक - युवतींनी व नगारिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा.
****
Comments
Post a Comment