लातूर जिल्हा होमगार्ड भरतीसाठीशारिरीक क्षमता चाचणीचेवेळापत्रक जाहीर
लातूर जिल्हा होमगार्ड भरतीसाठीशारिरीक क्षमता चाचणीचेवेळापत्रक जाहीर
लातूर दि. 23 : जिल्हाहोमगार्डमधील रिक्त असलेल्या 143 जागा भरण्याकरिता होमगार्ड नाव नोंदणीचे (भरतीचे)आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुरुष व महिला उमेदवारांसाठी शारिरीक क्षमताचाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लातूर पथकामधील 2हजार 160 उमेदवारांची 26 ऑगस्ट 2024 रोजी, उदगीर व निलंगा पथकातील 2 हजार 74 उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी 27ऑगस्ट 2024 रोजी आणि लातूर, औसा, उदगीर, अहमदपूर व निलंगा या सर्व पथकांमधील 704महिला उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी 28 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.लातूर जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांनी शारिरीक क्षमताचाचणीकरिता बाभळगांव पोलीस मुख्यालय येथे वेळेत हजर रहावे, असे आवाहन अपर पोलीसअधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक अजय देवरे यांनी केले आहे.****
Comments
Post a Comment