भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त # लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त #
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांसह सर्व जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासन अविरत प्रयत्न करीत आहे. यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकरी, महिला, युवक, वयोवृद्ध नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आवर्जून उल्लेख केला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांमधून जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती आपल्या संदेशात दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कारप्राप्त खेळाडू, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment