प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थी, मत्स्य कास्तकारांसाठी शुक्रवारी विशेष कार्यक्रम

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थी, मत्स्य कास्तकारांसाठी शुक्रवारी विशेष कार्यक्रम लातूर, दि. 28 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि इतर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त मस्त्य व्यवसाय (तां), लातूर व संभाजीराव केंद्र महाविद्यालय, जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. 30 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. जिल्हयातील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तसेच मत्स्य कास्तकार यांनी जळकोट येथील संभाजीराव केंद्र महाविद्यालय येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां ) तेजस्विनी करळे यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु