महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

प्रोत्साहनपर लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

लातूर, दि. 20 :   महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी महा-आयटी यांनी 12 ऑगस्ट, 2024 ते 7 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणासाठी टॅब उपलब्ध करुन दिला आहे.

तसेच या संबंधित राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानीदेखील लाभार्थी शेतकऱ्यांना व्यक्तीश: कळविण्याबाबत संबंधित बँकांना सूचित करण्यात आले आहे. जे शेतकरी या योजनेतंर्गत लाभासाठी पात्र ठरले आहेत व ज्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे.

तथापि ज्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांशी संपर्क साधून व आधार प्रमाणिकरण तात्काळ करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

***

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु