क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
लातूर दि. 22 : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, 23 ऑगस्ट, 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 23 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व मोटारीने शकुंतला निवासस्थानकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता शकुंतला निवासस्थान येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता उदगीर तालुक्यातील माळेवाडी येथे ओंमकार गुंडाप्पा स्वामी यांच्या नूतन वास्तुच्या वास्तुशांती व गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता उदगीर शहरातील पत्तेवार चौक मेन रोड येथे राजीव माधवराव पारसेवार यांच्या पारसेवार ब्रदर्स (सुटींग, शर्टींगचे भव्य दालन) च्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील नियोजित बालाजी मंदीर येथे श्री सदगुरु रंगनाथ महाराज परभणीकर, आर्य वैश्य सामाजिक प्रतिष्ठान येथे बालाजी मंदिर भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहतील.
ना. बनसोडे हे दुपारी 2.30 वाजता उदगीर तालुक्यातील लोणी (एमआयडीसी) येथे शेख फरीदसाब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी 3.30 वाजता उदगीर शहरातील सर्वोदय सोसायटी येथे श्री कपिल श्यामसुंदर मुक्कावार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 4 वाजता देगलूर रोडवरील डॉ. जयंत वायगांवकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सांयकाळी 7 वाजता उदगीर शहरातील विशाल फंक्शन हॉल येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी समवेत संवाद व बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
***
Comments
Post a Comment