उदगीर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शुक्रवारी होणार उद्घाटन
उदगीर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शुक्रवारी होणार उद्घाटन
लातूर, दि. ७ : उदगीर येथे सुरू होत असलेल्या नवीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. उदगीर शहरातील लिंबोटी प्रकल्प उद्भव इमारत जलशुध्दीकरण केंद्र येथे हा कार्यक्रम होणार आहे.
गृह विभागाने उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एमएच-५५ या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या नूतन कार्यालयाचे उद्घाटन ९ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment