क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते खेळाडू, मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण

लातूर, दि. १५ :  भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना सन २०१९-२० ते २०२२-२३ या काळातील जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यावेळी उपस्थित होते.

सन २०१९-२० चा जिल्हा क्रीडा पुरस्कार ज्ज्योती व्यंकट पवार (बेसबॉल) आणि महेफुजखान हाफिजउल्लाखान पठाण (तलवारबाजी) या खेळाडूंना आणि गुणवंत मार्गदर्शक महेश प्रकाश झुंजे-पाटील (मलखांब) यांना देण्यात आला. सन २०२०-२१ मधील पुरस्कार सोनाली लघु गायकवाड (तलवारबाजी), स्वप्नील शिवाजी मुळे (मल्लखांब) आणि गुणवंत मार्गदर्शक संतोष श्रीकृष्ण कदम (तलवारबाजी) यांना वितरीत करण्यात आला.

सन २०२१-२२ मधील जिल्हा क्रीडा पुरस्काराने माही किशोर आरदवाड (तलवारबाजी) आणि भाऊराव बाबुराव कदम (तलवारबाजी) या दोन खेळाडूंना गरविण्यात आले. तसेच सन २०२२-२३ मध्ये सुरज कालिदास कदम (तलावरबाजी), दिव्यांका संतोष कदम (तलवारबाजी) आणि गुणवंत मार्गदर्शक प्रशांत शिवराज माने (तलवारबाजी) यांना गरविण्यात आले.

सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक यांचे ना. बनसोडे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु