अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेसाठी अर्ज करण्यास 26 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहाय्यता बचतगटांना
मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेसाठी अर्ज करण्यास 26 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 12 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2017 नुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या शासन निर्णयात योजनेच्या मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या असून शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
या योजनेकरिता 2024-25 वर्षासाठी 10 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक बचत गटांनी लातूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment