महसूल पंधरवडा अंतर्गत 10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम
महसूल पंधरवडा अंतर्गत 10 ऑगस्ट रोजी
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम
लातूर, दि. 06 (जिमाका) : महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट2024 दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व त्यांच्या अवलंबितांच्या महसूल विभागाशी संबंधित अडीअडचणी सोडविण्यात येणार आहेत. तरी ज्यांची तक्रार असेल, त्यांनी अर्ज व संबंधित कागदपत्रासह या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment