शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
· भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक
लातूर, दि. 06 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींची 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज स्वीकारण्यासाठी सन 2024-25 पासून https://hmas.
नवीन वेबपोर्टलचा वापर करून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक, प्रवेशासाठी नियम, अटी व शर्ती यांची माहिती घेवून ऑनलाईन अर्ज भरू शकतात. शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक पदवी, पदविका प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयातील प्रेवशित विद्यार्थ्यांसाठी 30 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेबपोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या परंतु, रिक्त जागेअभावी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. तरी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment