क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी विविध पुरस्कारांचे वितरण
लातूर, दि. १५ : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय
मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस
अधीक्षक डॉ. अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा
पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा
नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
च्या अनुषंगाने द्वितीय अपील प्राधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल
प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, जिल्हा
परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,
जळकोटचे गट विकास अधिकारी एन. एस. मेडेवार, लातूरचे नायब तहसीलदार गणेश सरोदे,
रेणापूरचे नायब तहसीलदार श्रावण उगिले, निलंगा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन
शिंदे यांचा यामध्ये समावेश आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या
अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सर्वाधिक
वृक्ष लागवड करणाऱ्या उदगीर तालुक्यातील बामणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी
आणि निलंगा तालुक्यातील सरवडी या तीन ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांना
यावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कृषि विभागातील उल्लेखनीय
कामगिरीबद्दल उपविभागीय कृषि अधिकारी डी. पी. जाधव आणि सहायक प्रशासकीय अधिकारी
अशोक श्रीधर जालन यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता
पाचवीमध्ये आठवा क्रमांक मिळविल्याबद्दल कारसा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी
श्रेया दत्तात्रय बेद्रे, इयत्ता पाचवीमध्ये सीबीएससी/आयसीएसईमध्ये आठवा क्रमांक मिळविलेली
अहमदपूर किलबिल इंटरनॅशनल स्कूलची उन्नती मारोती जाधव, इयत्ता आठवीमध्ये आठवा क्रमांक
मिळविलेली लातूर येथील केशवराज माध्यमिक विद्यालयाची वृष्टी मनोज श्रीमंगले,
इयत्ता आठवीमध्ये 20 क्रमांक मिळविलेला संस्कार रमेश राऊतराव, इयत्ता आठवी सीबीएससी/आयसीएसईमध्ये
पाचवा क्रमांक मिळविलेला लातूर येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा आकाश बळीराम
नागरगोजे, आणि १३ वा क्रमांक मिळविलेला सोहम बालाजी दंडनायक यांचाही यावेळी प्रमाणपत्र
देवून सत्कार करण्यात आला.
****
Comments
Post a Comment