अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना
लातूर, दि. 08 (जिमाका) : सामाजिक न्या व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 9 डिसेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन स्तरावर निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक इच्छुक लाभार्थ्यांनी लातूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुन 30 सप्टेंबर, 2024 पूर्वी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, लातूर येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment