मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न करण्याचे आवाहन • आधारक्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार लातूर, दि. २८ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम ही पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे गरजेचे आहे. अद्याप ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (आधार लिंक) केलेले नाही, अशा महिलांनी आपले खाते असलेल्या बँकेत जावून आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात २ लाख ६७ हजार महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तसेच काही अर्जांमध्ये त्रुटी असल्याने हे अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया गतीने सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या, तसेच दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. आधार संलग्न बँक खात्यावरच योजनेची रक्कम जमा होणार असल्याने अशा महिलांनी आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जावून आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही करावी. यासाठी आधारकार्डची झेरोक्स प्रत आणि बँकेत उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे आवश्यक आहे. तरी महिलांनी बँक शाखेत स्वतः उपस्थित राहून आपले बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु