लातूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये घेण्यात आली तिरंगा प्रतिज्ञा

 लातूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये घेण्यात आली तिरंगा प्रतिज्ञा


 लातूर दि. 14:  हरघर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान लातूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहपूर्ण सुरू आहे. या अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी संबंधित कार्यालयाचे प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.  9 ऑगस्ट रोजी सकाळी तिरंगा यात्रेने या अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर निबंध स्पर्धा, तिरंगा रॅली, घरोघरी आणि कार्यालयांवर तिरंगा लावणे आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या अभियानांतर्गत 14 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमामध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु