मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकांनी कोणतेही कर्ज समायोजन न करण्याच्या सूचना

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकांनी कोणतेही कर्ज समायोजन न करण्याच्या सूचना


लातूर, दि. 20 (जिमाका) : राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या रक्कमेतून बँकांनी कोणत्याही कर्जाचे समायोजन करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रमोद शिंदे, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक बालाजी मरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित न करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांनी कार्यवाही करावी. तसेच काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास हे बँक खाते तत्काळ सुरु करण्यात यावे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर- घुगे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु