क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूर, दि. 13 : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे बुधवार, 14 ऑगस्ट 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सकाळी 8.40 वाजता लातूर येथून मोटारीने बाभळगावकडे प्रयाण करतील. सकाळी 9.05 वाजता बाभळगाव येथील विलासबाग येथे माजी मुख्यमंत्री लोकनेते कै. विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 9.30 वाजता बाभळगाव येथून मोटारीने जळकोटकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे श्री. बालाजी ताकबीडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सकाळी 11.20 वाजता वांजरवाडा येथे श्री. रंगनाथ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी 12 वाजता जळकोट तालुक्यातील लाळी (बु) येथे श्री. दुर्गादास गुलाबराव नाईक यांच्या निवासस्थानी, तसेच दुपारी 12.20 वाजता लाळी (खु.) येथे श्री. प्रेमदास वाघमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 12.50 वाजता मंगरुळ येथे श्री. सुभाष भाऊराव सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी, तर दुपारी 1.20 वाजता मंगरुळ येथे श्री. गुरुनाथ रामचंद्र कनके यांच्या निवासस्थानी आणि दुपारी 1.40 वाजता मंगरुळ येथील श्री. सय्यद अब्दुल रमजान यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 2.30 वाजता एकुरका (खु.) येथे श्री. वाळीव पंढरीनाथ केंद्रे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील.

ना. बनसोडे हे दुपारी 3 वाजता एकुरका (खु) येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी 3.45 वाजता उदगीर येथील जुने शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल व राखीव. सांयकाळी 5.30 वाजता उदगीर शहरातील जळकोट रोडवरील न्यू आदर्श कॉलनी येथे श्री. नारायण धोंडीराम जानतीने यांच्या मातोश्री निवास या नूतन वास्तूचा वास्तुशांती व गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहतील. सांयकाळी वाजता सराफा लाईन येथील श्री सदगुरु शंकरलिंग मठ येथे श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेश उत्सव 2024 च्या कार्यकारणी बैठकीस उपस्थित राहतील व सोयीनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु