रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार आता मोबाईल ॲपद्वारे नोंदविता येणार सार्वजनिक विभागाकडून खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित

रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार आता मोबाईल ॲपद्वारे नोंदविता येणार सार्वजनिक विभागाकडून खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित लातूर, दि. 21 : सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 18 हजार किमीपेक्षा अधिक रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. यामध्ये प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. या रस्त्यांवर पावसाळ्यानंतर पडणाऱ्या खड्ड्यांची माहिती सार्वजनिक विभागाला देण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक सलीम शेख यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियमित दुरूस्ती केली जाते. मात्र, सर्वसाधारणपणे पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे या खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली (पीसीआरएस) विकसित करण्यात आली आहे. या अँड्रॉइड ॲपद्वारे सर्व नागरिकांना सार्वजनिक विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यासंबंधी तक्रारी नोंदविता येणार आहेत. हे मोबाईल ॲपल http://mahapwd.gov.in/PMIS/PWPCRS_CITIZEN.apk या लिंकचा वापर करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल. तसेच गुगल प्ले स्टोअरवर कोणत्याही अँड्रॉईड मोबाईलमध्ये इंस्टॉल करता येईल. त्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.cdac.pwd.citizen&hl=en-IN या लिंकचा वापर करावा. पीसीआरएस अँड्रॉइड ॲप द्वारे खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया- १) नागरिकांनी त्यांच्या अँड्रॉइड फोनवर पीसीआरएस ॲप इंस्टॉल करावे. त्यासाठी आवश्यक जीपीएस आणि स्टोअरेजकरिता परवानग्या द्याव्यात. 2) या ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका, तुम्हाला एसएमएसद्वारे वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) प्राप्त होईल. लॉग इन करण्यासाठी कृपया हा ओटीपी टाकावा. 3) खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी ' रजिस्टर फीडबॅक ' बटणावर क्लिक करा आणि आपला मोबाईल जीपीएसच्या सहाय्याने आपले वर्तमान स्थान दर्शवेल, त्यानंतर कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा, पीसीआरएस ॲप आपला मोबाईल कॅमेरा उघडेल, त्यानंतर खड्ड्याचे छायाचित्र काढा व आपले तक्रार मोबाईलमार्फत टिप्पणीसह सबमिट करा. 4) तक्रार नोंदवल्यानंतर पीसीआरएस ॲपवर रस्त्याचे नाव, तालुका, साखळी क्रमांक इत्यादर माहिती वरुन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षेत्रीय अधिकारी ओळखेल, जर खड्डेबाबत तक्रार प्राप्त झालेला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील असल्यास प्रणालीद्वारे तक्रार क्रमांक तयार होईल व तसे नागरिक आणि संबंधित कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना एसएमएसद्वारे कळविले जाईल. ५) क्षेत्रीय कार्यालय कनिष्ठ अभियंता हे खड्डे दुरुस्त करतील आणि ७२ तासांच्या आत अँड्रॉइड ॲपद्वारे उत्तर देईल. त्यानंतर क्षेत्रीय उपअभियंता कनिष्ठ अभियंत्याच्या उत्तराची पडताळणी करतील आणि शेवटी १ दिवसाच्या आत नागरिकास अनुपालन सादर करतील व नागरिकास एसएमएसद्वारे सूचित केले जाईल. नागरीक वेळोवेळी पीसीआरएस ॲपवरुन त्यांच्या तक्राराची स्थिती पाहू शकतात. ६) सात दिवसांपर्यंतच्या विलंबावर उपअभियंता स्तरावर देखरेख ठेवली जाईल, ७ ते १५ दिवसांच्या विलंबाची प्रकरणे संबंधित कार्यकारी अभियंत्याद्वारे पुनरविलोकन केले जाईल. १५ ते ३० दिवसांच्या विलंबाचे निरीक्षण संबंधित अधीक्षक अभियंताद्वारे केले जाईल. ३० दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधित प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंताद्वारे पुनर्विलोकन आणि निरीक्षण केले जाईल. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा