‘क्रॉपसॅप’ अंतर्गत कीड रोग सर्वेक्षण व सल्ला विषयक मार्गदर्शन
‘क्रॉपसॅप’ अंतर्गत कीड रोग सर्वेक्षण व सल्ला विषयक मार्गदर्शन
लातूर, दि.9 (जिमाका) : पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) सन 2024-25 अंतर्गत कीड रोग सर्वेक्षण व सल्ला चमुसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण 7 ऑगस्ट,2024 रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे घेण्यात आले.
जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये कीड रोग सर्वेक्षण चमुंना खरीप कीड रोग सर्वेक्षण व सनियंत्रण, खरीपातील पिकाचे कीड व रोगाचे नियंत्रण, खरीप पीक व्यवस्थापन, इफ्को नॅनो युरीया व नॅनो डीएपी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या जिल्हास्तरीय प्रशिक्षणास विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, आत्माचे प्रकल्प संचालक एस. व्ही. लाडके, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर, लातूरचे उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव, उदगीरचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. एन. काळे, इफ्कोचे वरिष्ठ पणन व्यवस्थापक एम. एस. पोवार, कृषि विद्यावेता अरुण गुट्टे, कनिष्ठ शास्त्रज्ञ के.डी. दहीफळे, किटकशास्त्रज्ञ संदीप देशमुख तसेच सर्व तालुका कृषि अधिकारी व कीड रोग सर्वेक्षण व सल्ला चमू उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment