सुधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द

सुधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द लातूर, दि. 30 : आयोगाच्या आदेशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारीत दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. या पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत 30 आगस्ट, 2024 रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व 2 हजार 142 मतदान केंद्रावर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथेही मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीनुसार लातूर जिल्ह्यात 20 लाख 16 हजार 990 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 10 लाख 55 हजार 252 पुरुष मतदार आणि 9 लाख 61 हजार 676 महिला मतदार आणि 62 इतर मतदारांचा समावेश आहे. 234-लातूर ग्रामीण मतदारसघांत 1 लाख 74 हजार 92 पुरुष मतदार, 1 लाख 56 हजार 105 महिला मतदार आणि इतर 3 असे एकूण 3 लाख 30 हजार 200 मतदारांचा समावेश आहे. 235-लातूर शहर मतदारसघांत 2 लाख 3 हजार 374 पुरुष मतदार, 1 लाख 90 हजार 887 महिला मतदार आणि इतर 26 असे एकूण 3 लाख 94 हजार 287 मतदार, 236-अहमदपूर मतदारसघांत 1 लाख 80 हजार 529 पुरुष मतदार, 1 लाख 63 हजार 873 महिला मतदार आणि इतर 1 असे एकूण 3 लाख 44 हजार 403 मतदार, 237-उदगीर मतदारसघांत 1 लाख 65 हजार 811 पुरुष मतदार, 1 लाख 53 हजार 60 महिला मतदार आणि इतर 19 असे एकूण 3 लाख 18 हजार 890 मतदार समाविष्ट आहेत. 238-निलंगा मतदारसघांत 1 लाख 72 हजार 065 पुरुष मतदार, 1 लाख 56 हजार 1 महिला मतदार आणि इतर 9 असे एकूण 3 लाख 28 हजार 075 मतदार आहेत, तसेच 239-औसा मतदारसघांत 1 लाख 59 हजार 381 पुरुष मतदार, 1 लाख 41 हजार 750 महिला मतदार आणि इतर 4 असे एकूण 3 लाख 1 हजार 35 मतदार आहेत. छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यांदीत असेल, तरच त्यांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. त्यासाठी आपल्याकडे मतदार ओळखपत्र असले, तरीही मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 'वोटर हेल्पलाईन' ॲपचा वापर करावा. तसेच प्रसिध्द करण्यात आलेली अंतिम मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान मदत केंद्र येथे वोटर हेल्प सेंटर येथे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज स्वीकारले जातील. तसेच मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु