एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानावर मिळणार बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप • अर्ज करण्यास 26 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 22 : राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-2023 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, सोयाबीन इतर तेलबिया मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-2025 मध्ये योजनेतंर्गत चालू खरीप हंगामाध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in/farmarlogin या वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. अर्ज करण्याची पध्दत mahadbt.maharashtra.gov.in/farmarlogin पोर्टलवर लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकणे-'अर्ज करा' या बाबीवर क्लिक करणे – 'कृषि यांत्रिकीकरण'बाब निवडा यावर क्लिक करणे –'मुख्य घटक' बाबीवर क्लिक करणे-कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य –तपशिल बाबीवर क्लिक करुन मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे-यंत्र / औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करुन पिक संरक्षण औजारे निवडणे मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करुन बॅटरी संचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे-जतन करा.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु