Posts

Showing posts from December, 2021

अवैध मद्यविक्रीवर कारवाई 5 गुन्हयांमध्ये 4 अरोपींना अटक करुन 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  अवैध मद्यविक्रीवर कारवाई 5 गुन्हयांमध्ये 4 अरोपींना अटक करुन 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त   लातूर,दि.31 (जिमाका)-   राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक   श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर तसेच स्टाफनी हासेगाववाडी चौक, ता. औसा, जि. लातूर या ठिकाणी दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये देशी मद्याचे 8 बॉक्स (180 च्या 384 बाटल्या) तसेच गुन्ह़यामध्ये वापरलेली एक   दुकाची   मोटरसायकल जप्त केली या गुन्ह़यात दोन आरोपींना अटक केली. तसेच उदगीर विभागामध्ये कासारशिरसी, ता. निलंगा, कोकर्ला, ता. जळकोट व वंजारवाडा, ता. देवणी अशा ठिकाणी एकूण चार गुन्हे नोंदवून हातभट़टी 50 लिटर, देशी दारुच्या 180 मिलीच्या 43 बाटल्या तसेच विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या 68 बाटल्या व द...

जळकोट पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे

Image
  जळकोट पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर                                                   - राज्यमंत्री संजय बनसोडे          लातूर,दि.31 (जिमाका):-   जळकोट येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने 13 कोटीच्या निधीला प्रशासकिय मान्यता दिली आहे. पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. शासनाने यासाठी 13 कोटीचा निधी मंजूर केला आहे. पुढील काळात जळकोट येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे निवासस्थान उत्तमदर्जाचे सर्व सोईने युक्त, व   पर्यावरणपुरक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली होती.   ...

उदगीर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे

  उदगीर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर                                                    - राज्यमंत्री संजय बनसोडे लातूर,दि.31 (जिमाका):- उदगीर येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने 13 कोटीच्या निधीला प्रशासकिय मान्यता दिली आहे. पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. शासनाने यासाठी 13 कोटीचा निधी मंजूर केला आहे. पुढील काळात उदगीर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे निवासस्थान उत्तमदर्जाचे सर्व सोईसुविधा सह , पर्यावरणपुरक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली होती. पंचायत समिती हा ग्रामविकासाचा महत्तवाचा घटक असतो ग्रामीण विकासाला दिशा देण्याचे...

येत्या 23 जानेवारीपासून राबविण्यात येणारी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

  येत्या 23 जानेवारीपासून राबविण्यात येणारी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करावी                                        -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.   लातूर,दि.31-(जिमाका) जगातून पोलिओचे निर्मुलन करणेसाठी सन 1995 पासून पल्स पोलिओ मोहिम राबविली जाते. यात नियमित लसीकरण, पोलिओ संक्षयीत रुग्णांची तपासणी करणे व पल्स पोलिओ मोहिम यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने 23 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यात सर्वत्र पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची बैठक 30 डिसेंबर 2021 रोजी आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. लातूर जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 569 हे 05 वर्षे वयोगटातील लाभार्थी असून एकूण 2 हजार 128 बूथचे नियेाजन केले आहे. यात 9 हजार 661 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून 430 पर्यवेक्षकांची ने...

लातूर जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव "येळवस"...!!

Image
  लातूर जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव "येळवस"...!!   लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येत्या रविवार, दि.2 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती येते... तशी शेताशेतात माणसाची, भरती येते... कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या.....हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा..... 2 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल, यावेळी कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, त्या सांभाळून वेळाआमावस्या साजरी होईल. त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच...!!   कसा असतो सोहळा … !! वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो...आणि वेळाआमावस्या पहाटे घराघरात चूल पेटते... बेसनपिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या   ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी... म्हणजे भज्जी... ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात...

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत कलम 144 लागू

  वृत्त क्र.1157                                                             दिनांक:-30 डिसेंबर,2021   लातूर जिल्ह्याच्या हद्दीत कलम 144 लागू लातूर,दि.30-(जिमाका) कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठया प्रमाणात एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी...

मराठा आरक्षण आंदोलन - मृत्यूमुखी झालेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

  मराठा आरक्षण आंदोलन - मृत्यूमुखी झालेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत   लातूर,दि.30-(जिमाका) तहसील कार्यालय लातूर येथे तालूका क्रिडा समिती (मुरुड ) समितीचे अध्यक्ष   व आमदार लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त अंतिम करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात दिनांक 08 ऑगस्ट 2018 रोजी मृत्यूमूखी पडलेले मौ. माटेफळ येथील कै. रमेश ज्ञानोबा पाटील यांचे वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणे बाबतचा प्रस्ताव या कार्यालयाकडून शासनास सादर करण्यात आला होता.    सदर प्रस्ताव शासनाने मंजूरी देवून मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेले कै. रमेश ज्ञानोबा पाटील यांचे वारस उषाबाई रमेश पाटील यांना दहा लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर केली होती. सदर मदत निधीचा धनादेश आज रोजी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते उषाबाई रमेश पाटील यांना वाटप करण्यात आली. यावेळी तहसीलदार स्वप्निल पवार, निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव, तालूका क्रिडा अधिकारी, लातूर जिल्हा बँकेचे उपाध...

कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ ही तिसऱ्या लाटेची चाहूल..!

  कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ ही तिसऱ्या लाटेची चाहूल..!     *लातूर जिल्हयातील नागरिकांनी दक्ष राहून मार्गदर्शक सुचानांचे पालन करावे * पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन *नागरिकांनी आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे   लातूर,दि.30-(जिमाका) मागच्या काही दिवसात कोरोना रूग्ण संख्येत   होत असलेली वाढही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे जाणवते   आहे, त्यामूळे ही तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा तिचा कमीत कमी प्रभाव रहावा म्हणून लातूर जिल्हयातील नागरिकांनी दक्ष राहून पथ्य पाळावीत, संबंधित सर्व मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.   या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, दिवसेदिवस कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे जाणवते आहे. लातूर जिल्ह्याला तिसऱ्या लाटेपासून स्वताला सुरंक्षित ठेवण्यासाठी येथील नागरिकांनी पथ्य पाळणे गरजेचे आहे. या लाटेचा जिल्...

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु

  राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु   लातूर,दि.30-(जिमाका) जिल्ह्यातील सर्व शासन मान्‍यता प्राप्‍त अनुदानित/ विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महावि द्या लयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या अनुसूचित जाती , विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थी यांना   कळविण्‍यात येते की , सन 2021 - 2 2 या वर्षासाठी भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती ( GOI) व शिक्षण शुल्‍क , परीक्षा शुल्‍क ( FREESHIP ) , राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती , व्‍यावसायिक पाठयक्रमांशी संलग्‍न असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्‍यासाठी महाडिबीटी हे पोर्टल   दि.14 डिसेंबर 2021 रोजी सुरु करण्‍यात आलेले आहे. तेंव्‍हा सर्व प्राचार्य , कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्‍ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास दि.31 जानेवारी 2022 पर्यत ऑनलाईन सादर करण्‍याचे कळविण्‍यात आलेले होते. तथापि दि. 29 डिसेंबर 2021 र...

नाताळ व नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 2 लाख 98 हजार 530 इतक्या रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त

  नाताळ व नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 2 लाख 98 हजार 530 इतक्या रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त लातूर, दि.29 (जिमाका) :-   राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर तसेच स्टाफ यांनी गुन्हा क्र. 270/2021 अन्वये शिवाजी चौक, ढोकी-मुरुड रोड, ता. जि. लातूर या ठिकाणी दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये देशी मद्य 180 मिली   च्या 240 बाटल्या व देशी मद्य 90 मिलीच्या 1600 बाटल्या तसेच गुन्ह़यामध्ये वापरलेली एक चारचाकी कार इंडीगो क्र. MH-25-A-3339 असा एकूण 2,87,400/- रुपयांचा मुद्येमाल जप्त केला सदर गुन्ह़यात आरोपी श्रीधर सत्यानारायण गुलापल्ली , नरेश गौड रामागौड अली , नितीन रमेश दासाराम असे तीन आरोपींना अटक करुन मुंबई...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग   कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात   लातूर, दि.29 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुर, विधवा महिला, परितक्त्या महिला, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे राहणीमानाचा दर्जा सुधारावा. यासाठी 100 टक्के अनुदानावर 04 एकर कोरडवाहू जमीन किंवा 02 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध   करुन देण्यात येते. या योजनेतील पात्र लाभार्थी यांना सदरील योजनेचा लाभ देणेसाठी सन 2021-2022 मधील शासकीय रेडिरेकनरच्या दराप्रमाणे जमिन खरेदी करावयाची असल्याने लातूर जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना सन 2021-2022 मधील शासकीय रेडिरेकनर दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आह...

3 जानेवारी पूर्वी पहिला डोस घेण्याचे आवाहन

  3 जानेवारी पूर्वी पहिला डोस घेण्याचे आवाहन   लातूर, दि.28 (जिमाका) केंद्रशासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानूसार दि. ०३ जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे   वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण सुरु करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे दि. 03 जानेवारी 2022 नंतर 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींची लसीकरण केंद्रावर गर्दी होण्‍याची श्क्यता नाकारता येत नाही. तरी ज्‍या नागरीकांनी त्‍यांचा कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा पहीला डोस अद्याप   घेतलेला नाही. त्‍यांनी त्‍यांचा पहीला डोस 3 जानेवारी 2022 पूर्वी त्‍वरीत घ्‍यावा तसेच ज्‍यांचा दुस-या डोसचा   विहीत कालावधी पूर्ण झालेला आहे, त्‍यांनीही त्‍यांचा दुसरा डोस त्‍वरीत घेवून सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                                            ...

15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीकरणासाठी 14 नवीन केंद्र

    15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीकरणासाठी 14 नवीन केंद्र   लातूर, दि.28 (जिमाका) केंद्रशासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार दि. 03 जानेवारी 2022 पासून 15 ते 18वर्षे   वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण चालू करण्‍यात येत आहे. लातूर शहरात   इयत्‍ता 10 वी   ते 12 वी   तील विवीध शाळा/ महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांची संख्‍या 33 हजार 477 एवढी आहे. तरी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला–मुलींच्‍या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी शहरातील कांही प्रमुख महाविद्यालय/ विद्यालय येथे लसीकरण केंद्र स्‍थापन करण्‍यात येत आहेत :- राजश्री शाहु महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय, सोनवणे महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, यशवंत विद्यालय,गोदावरी देवी कन्या विद्यालय, राजस्थान हाय स्कुल, पोतदार स्कुल व झी मांऊट लिटेरा स्कूल. सर्व संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक यांना सूचित करण्यात   आलेले आहे. तरी संबधीत महाविद्यालयाच्‍या/ विद्यालयाच्‍या वि...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

Image
  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात   जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न            लातूर,दि.28(जिमाका) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे जैव-वैद्यकीय ( Bio-Medical Waste Management ) कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सूचनेनुसार सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संतोष मांगलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव सुर्यवंशी यांनी   या कार्यशाळेचे आयोजन केले होते. जैव-वैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण शास्त्रोक्त पध्दतीने कसे करावे व योग्य व्यवस्थापन केल्याने आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस तसेच रुग्णांना होणारी इजा व जंतूसंसर्ग रोखणे कसे शक्य आहे याबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच जैव- वैद्यकीय कचऱ्याची हाताळणी योग्य पध्दतीने करणे कायद्याच्या अनुषंगाने बंधनकारक असून त्यामूळे वायु व जलप्रदूषण रोखणे आवश्यक आहे, असे प्रशिक्षणा दरम्य...

कोव्हीड - 19 प्रतिबंधासाठी लातूर जिल्ह्यात निर्बंध जारी

  कोव्हीड - 19 प्रतिबंधासाठी लातूर जिल्ह्यात निर्बंध जारी   लातूर,दि.27 (जिमाका):-    शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड ,1 3 व 4 तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.   त्याअन्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला आहे.   हे यूएसए आणि युरापमधील अनेक देशांमध्ये प्रबळ असा प्रकार बनला आहे. राज्यात मागील काही दिवसांत एकूण 88 ओमिक्रॉन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्र राज्यात मागील एक आठवड्यापासून दररोज एक हजाराहून अधिक पॉझिटिव्ह कोविड-19 केसेसची नोंद होत आहेत. येत्या काही दिवसांत राज्यभरात नाताळ सण, लग्नसराई, इतर सण आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होण...