रब्बी हंगामातील पीकांसाठीच्या स्पर्धासाठी नवे निकष जाहिर

 

रब्बी हंगामातील पीकांसाठीच्या स्पर्धासाठी नवे निकष जाहिर

 

लातूर,दि.20 (जिमाका):- कृषि  खात्याकडून राज्यभर रब्बी हंगामात  घेतल्या  जाणा-या पीक स्पर्धांचे नविन निकष  प्राप्त झालेले आहेत. तृणधान्य, कडधान्य,गळीतधान्य पिकाच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आधीचे नियम, वेळापत्रक आणि बक्षीस रक्कमदेखील बदलण्यात आली आहे. चालू रब्बी हंगामापासुन  नव्या  निकषांची  अंमलबजावणी  होईल. त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत शेतकरी अर्ज करु शकतात.
            ज्वारी , गहु , हरभरा , करडई , जवस   तीळ इ. पिकांसाठी रब्बीत पिक स्पर्धा होईल. तालुका कृषि अधिकारी या स्पर्धांचे आयोजन करतील. त्यासाठी शेतक-याला किमान दहा आर.क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. तालुका स्तरावर सर्वसाधारण गटासाठी एका पिकासाठी 10 पेक्षा कमी व आदीवासी गटात 5 पेक्षा कमी अर्ज आल्यास स्पर्धा रद्द केली जाणार आहे. संबंधीत गावात त्यासाठी पीक कापणी समिती नेमली जाणार आहे. तालुका पातळीवर पहीले बक्षीस 5 हजारांचे , दुसरे 3 हजारांचे तर तिसरे 2 हजारांचे आहे. मात्र राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजारांचे , दुसरे 40 हजारांचे तर तिसरे 30 हजारांचे,राहील.
           गावपातळीवर पिक कापणी समिती पूढील प्रमाणे आहे.-पीक कापणी समितीत कोण असेल
 - पर्यवेक्षण अधिकारी (अध्यक्ष) , कृषि सहाय्यक (सदस्य सचिव) , लाभार्थी शेतकरी , सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , प्रगतशील शेतकरी , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक.

   राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कोण घोषीत करेल - कृषि आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती. जिल्हा व विभागस्तरावरील बक्षिसांची रक्कम - जिल्हास्तरावर , पहिले बक्षीस दहा हजारांचे , दुसरे सात हजारांचे तर तिसरे पाच हजारांचे असेल. विभागात पहिले बक्षीस 25 हजारांचे , दुसरे 20 हजारांचे तर तिसरे 15 हजारांचे राहील.

   प्राथमिक माहीती पूढील प्रमाणे आहे.- अर्ज कुठे कराल - तालुका कृषि अधिका-याकडे स्पर्धेची माहिती कोण सांगेल - कृषि सहाय्यक , कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी,  कोणती कागदपत्रे द्यावी लागतात -300 रु. स्पर्धा प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा,आठ अ, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र.

  अटी पूढील प्रमाणे आहे-, पीक किमान सलग दहा आर क्षेत्रावर हवे. स्पर्धेत कोणताही शेतकरी भाग घेऊ शकतो. एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग शक्य. स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रत्येकी 300 रु. पुरस्कारासाठी प्रथम , द्वितीय , तृतीय असे तीनच क्रमांक असतील. 

  तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या स्पर्धेसाठी अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                 ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु