वक्ता हा बहुश्रुत व चौफेर वाचनाने समृद्ध असावा -ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे

 

वक्ता हा बहुश्रुत व चौफेर वाचनाने समृद्ध असावा

-ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे 

*महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन 

 

लातूर,दि.15(जिमाका)-आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वक्ता हा बहुश्रुत व चौफेर वाचन आणि समृद्ध असला पाहिजे तसेच त्यांच्यामध्ये विषय मांडणी चातुर्य, विविध भाषा आणि चाणाक्ष प्रवृत्ती असली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी केले.

नेहरू युवा केंद्र, लातूर आणि राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या डिजिटल सभागृहामध्ये आजादी का अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये ते उद्घाटक म्हणून बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे होते तर विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्र लातूरच्या जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत गायकवाड, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई, डॉ.नारायण सूर्यवंशी, परीक्षक डॉ.राहूल डोंबे आणि पत्रकार आनंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पुढे बोलतांना जयप्रकाश दगडे म्हणाले की, वक्ता हा हजर जबाबी असणे आवश्यक असून त्याने वैयक्तिक विचारापेक्षा सार्वजनिक व सर्वधर्मसमभाव विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. वक्तृत्व एक कला असून तिला प्राप्त करण्यासाठी वक्त्याने उपासना व आराधना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमांमध्ये डॉ.बी.एम.गोडबोले, डॉ.श्रीकांत गायकवाड, डॉ.रत्नाकर बेडगे व डॉ.नारायण सूर्यवंशी आदींनी मनोगत पर मार्गदर्शन करून स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना साक्षी समैया म्हणाल्या की, आजादी का अमृत महोत्सवानिमित्ताने सर्व जिल्ह्यातील एकूण दहा तालुक्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती या विषयावर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या त्यानंतर आज प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात संपन्न होत आहे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये व तृतीय पारितोषिक एक हजार रुपये आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे त्यानंतर या स्पर्धेतून प्रथम विजेत्याला राज्यस्तरावरील वकृत्व स्पर्धेमध्ये पाठविले जाईल असे सांगून त्यांनीही स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या समारंभामध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आजादी का अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये आज जिल्हास्तरीय स्पर्धा आमच्या महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकानी सक्रिय सहभागी होऊन आपले विचार मांडावे असे सांगून त्यांनी ही सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहरू युवा केंद्रातील माने स्वप्निल सुधाकर, पाटिल रोहिनी दीपक, गुंजिते रविकांत हरिश्चंद्र, शेख मुजाहिद खलील, बिरादर प्रणव तानाजी, पाटिल अमर गोविन्दराव, कांबळे, सीताराम विजय डंपले, अविनाश भगत, येलकर भीमाशंकर, उमेश गाडे यांच्यासह रासेयोचे स्वहयंसेवक शिवानी जाधव, शशिकांत देडे, बालाजी कांबळे, गौरव कांबळे, अक्षता वराळे, ज्ञानेश्वरी चपटे, लक्ष्मण परताळे, वैभव गोरे, खंडू देडे, बालाजी कांबळे, शशिकांत देडे व वर्षा रसाळ यांनी परिश्रम घेतले.

 



                                                  **** 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु