देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या सवौच्च त्यागापुढे, आम्ही त्यांच्या प्रति सदैव कृतज्ञ -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

 

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या

सवौच्च त्यागापुढे, आम्ही त्यांच्या प्रति सदैव कृतज्ञ

            -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

 

लातूर दि.20 ( जिमाका ):- या देशासाठी सैनिकांचे बलिदान, देशाच्या सुरक्षिततेसाठीचे समर्पण, देशासाठी सर्वोच्च त्याग ह्या गोष्टीचे स्मरण ठेवून सैनिकांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी सदैव कृतज्ञता राखून प्रशासन काम करेल, लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी,त्यांचे कुटुंबीय यांचे प्रश्न आग्रक्रमाने सोडविण्याला प्राधान्य दिलं जाईल... भरती पूर्व सैनिक प्रशिक्षण केंद्र सुरु  करण्याबाबतच्या निधीची तरतूद करण्याबाबत आपण सकारात्मक प्रयत्न करु तसेच माजी सैनिकांसाठी गेस्ट हाऊसमधील दुरुस्ती करणार आहोत. माजी सैनिकांच्या पाल्यासाठी वसतीगृह जे कोविड काळात बंद होते... पुढच्या महिन्यात परिस्थितीचे अवलोकन करून ते सुरु करण्याबाबतही सकारात्मक विचार करु... शासन दरबारी जे जे माजी सैनिकांचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहिल अशी ग्वाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

   आज जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलन शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. या शुभारंभ  कार्यक्रमाला निवृत्त कमांडर कैलास गिरवलकर, निवृत्त मेजर व्ही व्ही पटवारी, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र.जिल्हा सैनिक अधिकारी  विजयकुमार ढगे मंचावर उपस्थित होते.

   

ध्वज निधी संकलनात लातूर तीन वर्षांपासून अग्रेसर

लातूर जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षात सैनिक कल्याण निधीसाठी ध्वज निधी संकलनाच्या निर्धारित इष्टांकापेक्षा अधिक निधी संकलन केले जात आहे. त्याबाबत शासनाकडून लातूर जिल्ह्याचा गौरवही करण्यात आला आहे.2019-20 मध्ये 110 टक्के तर गेल्या वर्षी 36 लाख 22 हजार इष्टांक होता पण संकलन झाले 52 लाख 71 हजार 459 रुपये म्हणजे 145 टक्के एवढी अधिकची निधी संकलन झाले. सर्व यंत्रणाचे यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी कौतुक करून..  यावर्षीचा 42 लाख 22 हजाराचा इष्टांकापेक्षा अधिकचा निधी जमा करण्याचे आवाहन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे म्हणाले की, माजी सैनिकांचे प्राधाण्याने प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच सैनिकांच्या कुटूंबांला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी देखील पोलीस प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे श्री. पिंगळे म्हणाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, जिल्हा परिषद ही नेहमीच सैनिकांच्या कल्याणसाठी तत्पर असल्याचे सांगून कोणाला काही अडचण असेल तर ती अग्रक्रमाणे सोडवू. यावेळी निवृत्त कमांडर कैलास गिरवलकर आणि निवृत्त मेजर व्ही.व्ही पटवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्ह्यातील माजी सैनिक / विधवांची संख्या माजी सैनिक आर्मीमधील 3 हजार 358, नेव्हीमधील 21, एअर फोर्समधील 32 असे जिल्ह्यात एकूण 3 हजार 411 आहे. तर माजी सैनिक विधवांची आर्मीमध्ये 747, नेव्हीमधील 5 , एअर फोर्समधील 8 असे एकूण 760 अशी संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण आर्मीधील संख्या 4 हजार 105 , नेव्हीमधील 26 , एअर फोर्समधील 40 असे एकूण 4 हजार 171 अशी एकूण जिल्ह्यातील संख्या आहे.

जिल्ह्यातील 21 शहीदांचे वीरपत्नी / वीरमाता / वीरपिता  यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 7 शौर्यपदकधारकांचेही शाल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांनी विविध क्षेत्रामध्ये राज्याचे नांव उंचावण्यामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यातर्फे विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात आहेत. त्याना पुरस्कार देवून प्रोत्साहित करण्यात आले. तसेच ध्वजदिन निधी संकलन 2020 च्या संकलनासाठी सर्वांनीच हातभार लावला आहे.परंतु, निधी संकलनात उत्कृष्ठ कार्य केलेल्या कार्यालयाच्या प्रमुखास व प्रतिनिधीस पुष्प व प्रशस्तीपत्र देवून यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले. कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.








00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु