जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन 2021-22 अंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अर्ज करावेत

 

जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन 2021-22

अंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अर्ज करावेत

 

        लातूर,दि.10(जिमाका):- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन 2021-22  अंतर्गत अन्नधान्य उत्पादनाच्या सुरक्षीत साठवणुकीसाठी गोदाम सुविधा आवश्यक असल्यामुळे या योजनेअंतर्गत  लातूर जिल्ह्यास 3 गोदाम बांधकामास मंजूरी मिळाली असल्यामुळे सदर गोदाम बांधकामाचा लाभ इच्छुक उत्पादक संघ/कंपनी(FPO/FPC) यांनी अर्ज करण्यासाठी पूढील अटी शर्तीच्या अधिन राहुन गोदाम बांधकाम करण्यासाठी दि.17 डिसेंबर 2021 पर्यंत उत्पादक संघ/ कंपनी (FPO/FPC)  यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी याच्याकडे अर्ज  करावेत असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

            या गोदाम बांधकाम हे 250 मे. टन क्षमतेचे असावे सदरील गोदाम बांधकामास खर्चाच्या 50 % अथवा  रु.12,50,000/- यापैकी जे कमी  असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. सदरील बाब ही बॅंक कर्जाशी निगडीत असल्यामुळे इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी(FPO/FPC)) केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बॅकेकडे प्रकल्प सादर करावा. बॅंकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधीत अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र  राहील. तालुका कृषि अधिकारी यांनी अशा अर्जदाराचे अर्ज  पुर्वसंमती करीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

             जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी पुर्वसंमती दिल्यानंतर संबंधीत लाभार्थ्यास बांधकाम सुरु करण्याबाबत कार्यारंभ आदेश द्यावेत. भौतिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बेठकीत सोडत पध्दतीने करण्यात येईल. सदरील गोदाम मंजूर झाल्यास 31 मार्च 2022 चा आत प्रकल्प उभा करणे बंधनकारक राहिल.  गोदाम बांधकाम लागणारे तांत्रिक मान्यता  वखार महामंडळाच्या  प्राधिकृत अधिकारी अथवा  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेणे बंधनकारक राहिल.

            गोदाम बांधकामाबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी/आधिक माहितीसाठी इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी(FPO/FPC)) संबंधीत तालुका कृषि अधिकारी,उपविभागीय कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

                                                          ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु