भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामित्त आदरांजली

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

महापरिनिर्वाण दिनामित्त आदरांजली

            लातूर,दि.6 (जिमाका)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामित्त आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, लातूर येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.

            या कार्यक्रमाची प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सुनिल महिंद्रकर, व  प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अविनाश देवसटवार, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर कार्यक्रमातील  सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी 2 मिनीट बाळगून आदरांजली वाहण्यात आली.

            या कार्यक्रमास सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), प्रभाकर डाके, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, शिवकांत चिकुर्ते, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर, सर्व महामंडळ येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामित्त लातूर जिल्हयातील 25 शासकीय वसतिगृह, 05 शासकीय निवासी शाळेमध्ये आदरांजली व मागासवर्गीय विदयार्थ्यांना जातीचा दाखला वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हयातील 05 शासकीय निवासी शाळेमधील एकूण 424 विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच दि. 06 डिसेंबर 2021 पासून सर्व शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आलेले आहेत.

                                                                       ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु