राखीव जागांवर नामनिर्देशन पत्रासोबत जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करावे

राखीव जागांवर नामनिर्देशन पत्रासोबत जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करावे

लातूर,दि.6 (जिमाका)- राज्‍य निवडणूक आयोग यांनी लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर व शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ करिता नगर विकास विभागाचे सन २०२१ च्‍या अध्‍यादेश क्र १५, दिनांक ०६ डिसेंबर २०२१ अन्‍वये नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र देण्‍यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची सत्‍यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्‍याबाबतचा अन्‍य कोणताही पुरावा आणि निवडून आल्‍याच्‍या दिनांकापासून १२ महिन्‍यांच्‍या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्‍याची मुभा उमेदवारांना दिली आहे.

यापुर्वी राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या निवडणूक कार्याक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशानपत्रे दाखल करणे शक्‍य व्‍हावे या हेतूने नामनिर्देशनपत्राचा कालावधी दिनांक ०७ डिसेंबर २०२१ रोजी म्‍हणजेच शेवटच्‍या दिवशी संध्‍याकाळी ५ वाजेपर्यंत वाढविला आहे. तसेच उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्‍यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची सत्‍यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्‍याबाबतचा अन्‍य कोणताही पुरावा तसेच विहित नमुन्‍यातील हमीपत्र सादर करण्‍यास दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्‍यात आली आहे.

उमेदवारांकडून विहित नमुन्‍यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्‍यासाठी सादर केलेल्‍या अर्जाची पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍याबाबत चारही निवडणूक निर्णय अधिका-यांना जिल्‍हाधिकारी बी.पी.पृथ्‍वीराज यांनी कळविले आहे.

                                                                         ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु