निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागाची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
निर्यातक्षम फळे व
भाजीपाला बागाची ऑनलाईन
नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर दि.22(जिमाका):- महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन लातुर जिल्ह्यामध्ये
विशेषत:द्राक्ष ,डाळींब ,आंबा या फळ पिकांची व विविध भाजीपाला पिकाची व्यावसायिक दृष्टीकेाणातून लागवड करुन नवनवीन
तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येते.
निर्यातीसाठी युरोपीयन देशांनी किडनाशक उर्वरत अंश मुक्तीची
संबंधी हमी अट घातलेली आहे. यामुळे अपेडाच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष पिकासाठी
ग्रेपनेट,आंब्याकरीता मँगोनट, डाळींबाकरीता अनारनेट , भाजीपाला पिकाकरीता
व्हेजनेट तसेच संत्रा, मोसंबी व लिंबुकरीता
सिट्रसनेट त्याचप्रमाणे कांदा पिकासाठी
ओनियननेट या पिकाच्या ऑनलाईन नोंदणीकरीता अपेडाच्या साईटवर
सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
लातूर जिल्हयातुन उत्पादीत होणाऱ्या द्राक्षांना विदेशातून विशेष मागणी
आहे.फळे व भाजीपला निर्यातीतून शेतकऱ्याना चांगल्या प्रमाणात नफा मिळू शकतो. जिल्ह्यामध्ये
आतापर्यांत 127 निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी करण्यात आलेली आहे .
निर्यातीसाठी द्राक्ष बागेची अंतिम नोंदणीची मुदत 30 डिसेंबर 2021 असुन जिल्हयातील
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातीच्या दृष्टीने बागाची नोंदणी करुन घ्यावी असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
Comments
Post a Comment