केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत संसाधन व्यक्तींची नामिकासूची अर्ज करण्याचे आवाहन

 

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत संसाधन व्यक्तींची

नामिकासूची अर्ज करण्याचे आवाहन

           

लातूर दि.22 (जिमाका):- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपूरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel of Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी शर्तीनूसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

संसाधन व्यक्ती (Resource Persons)  नामांकित राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी/C.A. अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन / वृध्दी, नविन उत्पादन विकसीत करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

            या  पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतीम दि. 5 जानेवारी 2022 असून अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिक्षमिक (मानधन) इतर अटी शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयात उपल्ब्ध आहेत. तसेच कृषि विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in  यावर उपलब्ध आहेत.  (टिप-सदर पदासाठी संस्था पात्र असणार नाही.) असे ही पत्रकात नमुद केले आहे.

 

 

 

                                 *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु