ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या गाव हद्यीतील मद्य विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जारी - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या गाव हद्यीतील
मद्य विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचे
आदेश जारी
- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
लातूर दि.21(जिमाका):-राज्य निवडणूक
आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह़यातील औसा, निलंगा, अहमदपुर,
रेणापूर, जळकोट, देवणी, उदगीर, शिरुर अनंतपाळ, लातूर अशा एकूण 12 ग्रामपंचायतींमधील
201 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार
असून दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
मा.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या नमूद निर्देशान्वये तसेच महाराष्ट्र
मद्यनिषेध कायदा-1949 व त्याअंतर्गत विविध नियमातील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांनी औसा, निलंगा, अहमदपुर, रेणापूर,
जळकोट, देवणी, उदगीर, शिरुर अनंतपाळ, उदगीर, लातूर येथील सोबत जोडलेल्या 125 ग्रामपंचायत
हद्यीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांचे मद्य विक्रीचे व्यवहार खालीलप्रमाणे पूर्णत:
बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
अनुज्ञप्ती
बंद ठेवावयाची तारीखा दिनांक 19 डिसेंबर, 2021 रोजी मतदान संपण्यापूर्वी 48 तास आधी
म्हणजे सायं. 6-00 वाजेपासून, दिनांक 20 डिसेंबर, 2021 मतदानाच्या पूर्वीचा दिवस -
संपूर्ण दिवस, दिनांक 21 डिसेंबर, 2021 मतदानाचा दिवस - संपूर्ण दिवस, दिनांक 22 डिसेंबर,
2021 मतमोजणीचादिवस - मतमोजणी संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत अनुज्ञप्ती बंद ठेवावयाची
तारीखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
या आदेशाची औसा, निलंगा, अहमदपुर, रेणापूर,
जळकोट, देवणी, उदगीर, शिरुर अनंतपाळ, उदगीर, लातूर येथील सोबत जोडलेल्या 125 ग्रामपंचायत
हद्यीतील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची
अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरु़ध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम
54 (1) (सी) नुसार तसेच अनुषंगिक नियमांनुसार कडक कारवाई करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.
0000
Comments
Post a Comment