नामनिर्देशनपत्रासोबत जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करण्यास मुदत वाढ
नामनिर्देशनपत्रासोबत जात
पडताळणी समितीकडे सादर केलेल्या
अर्जाची पोचपावती व हमीपत्र
सादर करण्यास मुदत वाढ
लातूर,दि.6 (जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या ग्रामपंचायत
पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करणे शक्य व्हावे या
हेतुने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक 06 डिसेंबर 2021 रोजी सायं.
05.00 पर्यंत वाढविण्यात आल्याचे संदर्भीय पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने कळविले
आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जातपडताळणी समितीकडे
सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्या बाबतचा अन्य
कोणताही पुरावा तसेच विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास दिनांक 07 डिसेंबर
2021 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे तहसीलदार (सर्वसाधारण)
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी कळविले आहे.
संदर्भीय पत्राची व सहपत्राची छायाप्रत यासोबत संलग्न केली असून त्यामध्ये दिलेल्या
निर्देशांचे अनुषंगाने उमेदवारांकडून विहीत नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे
वैधताप्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र
स्विकारण्याबाबत उचित कार्यवाही अनुसरणेसाठी सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व
संबंधीत उमेदवार यांना तात्काळ अवगत करावे असे ही पत्रकात नमुद केले आहे.
****
Comments
Post a Comment