ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
ग्राहक संरक्षण
कायद्याविषयी
ग्राहकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
लातूर,दि.27 (जिमाका):- “ जागो ग्राहक जागो ”
या उक्तीप्रमाणे ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायदा समजून घेण्याची गरज आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याविषयी अद्याप म्हणावी, तेवढी जनजागृती व कायद्याचे ज्ञानाविषयी अज्ञानता दिसून येत आहे. परंतू, या कायद्याविषयी ग्राहकांत जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच प्रसार माध्यमांनाही ग्राहकांमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याविषयीच्या माहितीचेही जनजागृती करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहन केले.जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक
व व्यापारी - विश्वास निर्माण व वृध्दींगत करण्याबाबतचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व
दिपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे
अध्यक्ष कमलाकर कोठेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,
जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदूणे, लातूर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष जगदीश
भराडिया, जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य श्री. राठोडकर, जेष्ठ विधीज्ञ श्री.जवळकर,
विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रास्त भाव दुकानदार, ग्राहक, व्यापारी आदिंची
उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. मार्गदर्शनपर बोलतांना म्हणाले की, राष्ट्रीय ग्राहक दिन हा
दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स.1986 साली 24 डिसेंबर या
दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती.
तेंव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा
कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे
लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सुरक्षेचा
हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा हक्क, तक्रार व निवारण करुन घेण्याचा हक्क ,
ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार हे सहा हक्क मिळाले आहेत. ग्राहक म्हणजे जो
वस्तू किंवा सेवा खरेदी करतो व त्यांचा उपभोग करतो अशी व्यक्ती होय. ग्राहक
संरक्षण म्हणजे ग्राहकांचे विक्रेत्याकडून आर्थिक, मानसिक पिळवणुकीपासून संरक्षण
मिळत असते.
प्रमुख
उद्घाटक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे अध्यक्ष कमलाकर कोठेकर म्हणाले की,
जिल्ह्यात 7 हजार 139 तक्रारीपैकी 6 हजार 520 तक्रारी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण
मंच, लातूर या कार्यालयामार्फत निकाली काढण्यात आलेले आहेत. ग्राहक दिन हा
ग्राहकांसाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठीचा हा कायदा आहे. सेवांच्या त्रुटीबद्दल
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार करता येवू शकते.
नवीन ग्राहक संरक्षण अधिनियम -2019 या कायद्याचा सखोल असा अभ्यास करावा व इतरांना
या कायाद्याचे ज्ञान सांगून जनजागृती करावी. ग्राहक हा जागरुक असला पाहिजे,
ग्राहकांनी ग्राहक कायद्याचा योग्य वापर करुन लाभ घ्यावा. ही सेवा एकतर्फी नसून
दोन्हीबाजूने याचा लाभ होवू शकतो. सर्वांसाठी सर्वांचे म्हणणे ऐकून घेवून
ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात येतो.
जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, ग्राहकांसाठी ग्राहक
सरंक्षण विभाग तत्पर आहे. जागो ग्राहक, जागो उक्तीप्रमाणे ग्राहक हा महत्वाचा आहे.
त्यासाठी आपण सर्वांनीच जाकरुक असणे आवश्यक आहे.
जेष्ठ
विधीज्ञ श्री. जवळकर यांनी ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या तक्रारी ग्राहक निवारण
मंचामध्ये करु शकतो याबाबतची माहिती उदाहरणासह उपस्थितांना दिली. ग्राहक हा राजा
आहे. अनुचित व्यापारी प्रथा असू नये. तसेच उत्पादक यांना आळाही यामुळे बसणार
असल्याचे सांगितले.
0000
Comments
Post a Comment