निवृत्तीवेतन धारकांनी जुन्या अथवा नवीन पध्दतीने विकल्प सादर करणे अनिवार्य

 

निवृत्तीवेतन धारकांनी जुन्या अथवा नवीन पध्दतीने

विकल्प सादर करणे अनिवार्य

 

लातूर,दि.7(जिमाका):- जिल्हा कोषागार अधिकारी,लातूर अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ज्या निवृत्तीवेतन धारकाचे वार्षिक एकूण 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त निवृत्तीवेतन आहे, अशा निवृत्तीवेतन धारकांनी जुन्या अथवा नवीन पध्दतीने विकल्प निवडून कोषागार कार्यालय लातूर येथे सादर करणे अनिवार्य आहे.असे जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर यांनी कळविले आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये केलेल्या बचतीची माहिती योग्य त्या पराव्यासह व पॅन क्रमांक, बँक शाखा व पी.पी.ओ. नंबर इत्यादी सह या कार्यालयास दि. 10 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावी.अन्यथा नियमानुसार निवृत्तीवेतनामधून आयकर कपात करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

ज्या आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकाचे पॅन क्रमांक अद्याप कोषागारास देण्यात आलेले नाही त्यांचे आयकर अधिनियम 206AA नुसार 20 टक्के दराने आयकर कपात करण्यात येईल. निवृत्तीवेतन धारकांनी आपली माहिती विहीत वेळेत कोषागार कार्यालय, लातूर येथे उपलब्ध्‍ करुन दयावी असे कोषागार अधिकारी लातूर यांनी आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                           ****                 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु