जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थासह प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत
स्थानिक स्वराज्य संस्थासह प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
विविध आस्थापनांना प्र. जिल्हाधिकारी लोखंडे यांनी दिले निर्देश
n *लसीकरणाचा पहिला मात्रा दि.5 डिसेंबरपूर्वी घेणे
अनिवार्य*
n *नियमांचे पालन होत आहे हे पाहण्यासाठी स्थानिक
प्राधिकरणाने पथकांची नियुक्ती करावी*
*लातूर,दि.1(जिमाका):-* केंद्र शासनाने वेळोवेळी
निर्धारित केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे ( सीएबी) , सेवा प्रदाते, जागांचे मालक,
परवानाधारक, आयोजक, आस्थापनाधारक इत्यादीसह सर्वांनी तसेच अभ्यागत, सेवा घेणारे ग्राहक,
अतिथी इत्यादींनी काटेकोर पालन करणे आवश्यक असून दिनांक 5 डिसेंबर, 2021 पर्यंत लसीकरणाबाबत
प्रशासनाला प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज कार्यवाहीबाबत अवगत केले
आहे.
लातूर शहर महानगरपालिका
क्षेत्रातील, नगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भागात प्रत्येक पोलीस स्टेशन
कार्यक्षेत्रातील नागरिक यांच्याकडून कोविड-19 अनुरुप वर्तनाचे ( Covid Appropriate Behaviour) पालन होत आहे किंवा नाही तसचे
लसीकरण घेतल्याबाबतची तपासणी करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण ( मनपा, नगर परिष, नगर पंचायत,
ग्रामीण भाग, ( गटविकास अधिकारी पंचायत समिती) यांनी पोलीस विभागाच्या मदतीनपे पथकांची
नियुक्ती करावी.
सदरील पथक स्थापन करतांना स्थानिक प्राधिकरण ( मनपा, नगर
परिषद, नगर पंचायत, ग्रामीण भाग ( गटविकास अधिकारी, पंचायत समिती) यांचे कर्मचारी व
त्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी यांचे नांव, पद, मोबाईल क्रमांक
यासह आदेश इंसिडेंट कमांडर ( मनपा क्षेत्रात आयुक्त मनपा व तहसील क्षेत्रांत संबंधित
तहसीलदार) यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात यावेत. या पथकांनी सकाळी 10-00 ते
दुपारी 12-00 व सांयकाळी 6-00 ते रात्री 8-00 या वेळेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात
( गर्दीचे ठिकाणे, शॉपींग मॉल, दुकाने, भाजी मंडई, विविध आस्थापना, पेंट्रोलपंप, समारंभ,
संमेलन, मेळावे इत्यादी) ठिकाणी नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेण्यास
प्रवृत्त करावे. तसेच प्रशासनाच्या आदेशांचे पालन होईल हे सुनिश्चित करावे. पथकांच्या
वेळेत व भेटी द्यावयाच्या स्थळात वेळोवेळी बदल करत रहावे.
मनपा, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामीण भाग ( गटविकास अधिकारी,
पंचायत समिती) यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आजपासून फिरत्या वाहनातील ध्वनिक्षेपक व
पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टिमद्वारे नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस व ज्यांनी पहिला
डोस घेतला आहे, अशा नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करावा याबाबत सातत्याने आवाहन
करित आहे. जे व्यक्ती, आस्थापना, संस्था कोविड अनुरुप वर्तन नियमांचे उल्लंघन करित
असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.
नियुक्त करण्यात येणाऱ्या पथकांनी नागरिकांना दंड करणे हा
प्रशासनाचा प्राथमिक उद्देश नसून जास्तीत-जास्त नागरिकांनी कोविड अनुरुप वर्तन करणे
व कोविडपासून सुरक्षिततेसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेणे हा आहे, याची जाणवी
सर्व नागरिकांना करुन देण्यात यावी. विषयांकित प्रकरणात आपणांकडून केलेल्या कार्यवाहीचा
अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी
तथा जिल्हादंडाधिकारी (प्र) अरविंद लोखंडे यांनी जिल्ह्यातील विविध आस्थापनांना कळविले
आहे.
****
Comments
Post a Comment