जवाहर नवोदय विद्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा

 

जवाहर नवोदय विद्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र

यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा

 

                 लातूर,दि.3 (जिमाका) :-  जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवोदय मधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मान संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील व प्राचार्य जी रमेश राव यांच्या हस्ते करण्यात आले.

         या प्रसंगी डॉ. राजेश पाटील म्हणाले की, समाजामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत संवेदना निर्माण व्हायला हवी. नवोदय मधील आपण हुशार विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासोबतच सामाजिक जाणिवेची जपणूक करायला हवी. आपण दिव्यांगांना समान वागणूक द्यावी.

            या प्रसंगी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्व संवेदना प्रकल्पाचे  व्यंकट लामजणे यांनी विषद केले. दिव्यांगांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण फिजीओथेरपीस्ट मयुरी बिल्लावार यांनी केले. तर योगेश्वर बुरांडे यांनी निरामय आरोग्य विमा योजनेची माहिती दिली. प्राचार्य जी रमेश राव यांनी संत सुरदास, हेलन केलर यांची उदाहरणे देऊन दिव्यांगसुद्धा उंच भरारी घेऊ शकतात असे प्रतिपादन केले.

 

                                                                  


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु