3 जानेवारी पूर्वी पहिला डोस घेण्याचे आवाहन

 

3 जानेवारी पूर्वी पहिला डोस घेण्याचे आवाहन

 

लातूर, दि.28 (जिमाका) केंद्रशासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानूसार दि. ०३ जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे  वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण सुरु करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे दि. 03 जानेवारी 2022 नंतर 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींची लसीकरण केंद्रावर गर्दी होण्‍याची श्क्यता नाकारता येत नाही.

तरी ज्‍या नागरीकांनी त्‍यांचा कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा पहीला डोस अद्याप  घेतलेला नाही. त्‍यांनी त्‍यांचा पहीला डोस 3 जानेवारी 2022 पूर्वी त्‍वरीत घ्‍यावा तसेच ज्‍यांचा दुस-या डोसचा  विहीत कालावधी पूर्ण झालेला आहे, त्‍यांनीही त्‍यांचा दुसरा डोस त्‍वरीत घेवून सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                *****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा