जळकोट पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे

 

जळकोट पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी

निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर

                                                  - राज्यमंत्री संजय बनसोडे

         लातूर,दि.31 (जिमाका):-  जळकोट येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने 13 कोटीच्या निधीला प्रशासकिय मान्यता दिली आहे. पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. शासनाने यासाठी 13 कोटीचा निधी मंजूर केला आहे. पुढील काळात जळकोट येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे निवासस्थान उत्तमदर्जाचे सर्व सोईने युक्त, व  पर्यावरणपुरक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली होती.

                 पंचायत समिती हा ग्रामविकासाचा महत्तवाचा घटक असतो ग्रामीण विकासाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून होत असते यामुळेच येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना सोई-सुविधा देण्यात येतात मागील काही काळापासुन पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला होता. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थानी अभावी मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत होता यामुळेच या बाबतचा शासन स्तरावर सतत पाठपुरावा  करुन त्यासाठी शासनाकडुन 13 कोटीचा निधी मंजुर करुन घेतला आहे. या निधीतुन सुमारे 26 उत्तम दर्जाचे निवासस्थाने निर्माण करण्यात येणार आहेत. ही निवासस्थाने उत्तम, सर्व सोई-सुविधेने युक्त व पर्यावरणपुरक असतील. या निवासस्थानामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवाराची उत्तम सोय होणार आहे. मागील दोन वर्षापासुन जळकोट शहराचा विकास अतिशय जलदगतीने होत आहे. पायाभुत सुविधासह सर्वांगीण विकासाला मागील दोन वर्षात चालना मिळाली आहे. आज राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने हा निधी मंजुर केला आहे. लवकरच हे काम सुरू होईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.



0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा