कोव्हीड - 19 प्रतिबंधासाठी लातूर जिल्ह्यात निर्बंध जारी
कोव्हीड - 19 प्रतिबंधासाठी लातूर जिल्ह्यात
निर्बंध जारी
लातूर,दि.27
(जिमाका):- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन
खंड ,1 3 व 4 तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार
करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. त्याअन्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात
कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जगभरात
गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून कोरोना विषाणूचा
ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला आहे. हे यूएसए आणि युरापमधील अनेक देशांमध्ये प्रबळ असा प्रकार बनला
आहे. राज्यात मागील काही दिवसांत एकूण 88 ओमिक्रॉन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली
आहेत. महाराष्ट्र राज्यात मागील एक आठवड्यापासून दररोज एक हजाराहून अधिक पॉझिटिव्ह
कोविड-19 केसेसची नोंद होत आहेत. येत्या काही दिवसांत राज्यभरात नाताळ सण,
लग्नसराई, इतर सण आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी
होण्याची शक्यता आहे.
या
वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदेश दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 च्या
निर्बधांव्यतिरिक्त आणखी काही निर्बंध लादणे अगत्याचे झाले असून याबाबत दिनांक 24
डिसेंबर 2021 च्या शासन आदेशान्वये आणखी काही निर्बंध लावण्यात आले
आहेत. याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती.
जिल्हाधिकारी
तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज
बी.पी. यांनी आपत्ती व्यवसथापन अधिनियम- 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897,
फौजदारी प्रक्रिया संहिता-1973, महाराष्ट्र कोव्हीड -19 उपाययोजना नियम-2020 व दिनांक 24 डिसेंबर 2021 अन्वये कोविड-19
विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने दिनांक 29 नोव्हेंबर, 2021
अन्वये लावण्यात आलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त आणखी काही निर्बंध लावणे आवश्यक
असल्याने पूढील प्रमाणे
आदेश निर्गमित करीत आहे.
नाताळ सण
(Christmas Festival) साजरा करताना महाराष्ट्र शासन ( गृह विभाग) यांचे परिपत्रक
क्र. दिनांक 23 डिसेंबर, 2021 रोजीच्या निर्गमित करण्यता आलेल्या मार्गदर्शक
सुचनाचे पालन करण्यात यावे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी
उपस्थितांची संख्या 100 व्यक्तींसंख्येच्या मर्यादेपेक्षा नसावी आणि खुल्या जागत
ही संख्या 250 व्यक्तींसंख्येच्या मर्यादेपेक्षा किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25
टक्के यापैंकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील
उपस्थितांची संख्या 100 व्यक्तींसंख्येच्या मर्यादेपेक्षा नसावी आणि खुल्या जागेत
ही संख्या 250 व्यक्तींसंख्येच्या मर्यादेपेक्षा किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25
टक्के यापैंकी जे कमी असेल ते. या श्रेणीच्या कार्यक्रम / समारंभां व्यतिरिक्त इतर
कार्यक्रम / समारंभ / ई. कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित
आहे अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते
जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25
टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी
कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे
करतांना दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 च्या आदेशाचे पालन होईल याची दक्षता घेण्यात
यावी.
उपहार
गृहे, जीम,स्पा, चित्रपटगृहे, नाटयगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती
राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर
करावी लागेल. संपूर्ण जिल्ह्यात रात्री 9.00 ते सकाळी 6.00 यावेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा
जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर प्रतिबंध असेल. याशिवाय स्थानिक परिस्थितीचा
विचार करुन आवश्यकतेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणव्दारे जनतेस
पूर्वकल्पना देऊन अतिरिक्त निर्बंध लावतील.
या
आदेशात ज्या बाबी नमूद करण्यात आलेले नाहीत त्याबाबत दिनांक 29 नोव्हेंबर, 2021
च्या आदेशान्वये लावण्यात आलेले निर्बंध / मार्गदर्शक सूचना लागू राहतील. प्रस्तुत
आदेश दिनांक 25 डिसेंबर, 2021 रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. सर्व
संबंधित प्रशासकीय विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या
आदेशाची तंतोतंत
अंमलबजावणी करावी.
या
आदेशाचे किंवा आदेशातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या
तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19
उपाययोजना नियम, 2020 ई. मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल असेही पत्रकात
नमुद केले आहे.
****
Comments
Post a Comment