नि. चाकूर अर्बन को- आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बाबत आक्षेप हरकत असतील तर 22 डिसेंबर पर्यंत दाखल करावेत
नि. चाकूर
अर्बन को- आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बाबत आक्षेप हरकत
असतील तर
22 डिसेंबर पर्यंत दाखल करावेत
लातूर,दि.13(जिमाका):-जिल्हयातील सर्व
अर्बन सहकारी पतसंस्थांना सुचित करण्यात येते की, नि. चाकुर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट
सोसायटी लि.लातुर ता.जि.लातूर मुख्यालय चाकुर या
संस्थेचा नोंदणी प्रस्ताव
या कार्यालयास दिनांक 12 नोव्हेंबर
2021 रोजी दाखल झालेला आहे. उक्त नि.अर्बन
सहकारी पतसंस्था नोंदणी
बाबत जिल्हयातील कार्यरत
सर्व अर्बन सहकारी
पतसंस्थांना व संस्थेच्या
सभासदांना नियोजित संस्थेमध्ये
समाविष्ट असलेले सभासदांबाबत
व नोंदणीबाबत आक्षेप
व हरकत असल्यास
या जाहिर प्रसिध्दीकरणाचे
दिनांकापासून दहा दिवसाचे
आत कार्यालयीन वेळेत
लेखी स्वरुपात या
कार्यालयास सादर करावे.अथवा दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था,लातूर प्रशासकीय इमारत,लातूर येथे सकाळी
11-30 वाजता समक्ष सुनावणीस उपस्थित
राहून तोंडी/लेखी म्हणने/आक्षेप/दावे
सादर करावे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
मुदतीनंतर प्राप्त होणा-या आक्षेप व हरकतीचा
विचार केला जाणार
नाही. सबब
नि.चाकुर
अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.लातूर ता.जि.लातूर मुख्यालय चाकुर नोंदणी
बाबतची पुढील कार्यवाही
करण्यात येईल याची नोंद
घ्यावी. नियोजित
संस्थेच्या प्रवर्तक सभासदांची
यादी या कार्यालयात
पहावयास मिळेल असे प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.
Comments
Post a Comment