सावेवाडी येथील शासकीय मागासवर्गीय मुलींचे (जुने) वसतीगृहामध्ये प्रवेश अर्ज वाटप चालू
सावेवाडी येथील
शासकीय मागासवर्गीय मुलींचे (जुने)
वसतीगृहामध्ये प्रवेश
अर्ज वाटप चालू
लातूर,दि.13(जिमाका):- मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) सावेवाडी
हे महाराष्ट्र
शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहायविभाग मार्फत संचलित असून सदर वसतिगृह
लाभार्थ्यासाठी सुरु करण्यात येत असून प्रवर्गनिहाय गुणवत्ते नुसार मोफत प्रवेश
देण्यात येतो त्यासाठी मोफत प्रवेश अर्ज वाटप चालू झाले आहे.
सदर वसतिगृहाची प्रशस्त इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी
असून निवासासह भोजन, निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्क्म आदी सुविधा पुरविल्या जातात.
एकूण रिक्त जागा - 56 आहेत असे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) सावेवाडी लातूर यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment