जागतिक मृग दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी कासारशिरसी येथे कार्यशाळेचे आयोजन

 

जागतिक मृग दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी

कासारशिरसी येथे कार्यशाळेचे आयोजन

 

            लातूर,दि.3 (जिमाका)- जिल्हास्तरीय जागतिक मृदा दिनानिमित्त कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व ए.डी.एम ॲग्रो लातूर यांचे संयुक्त विद्यमाने मु.पो.कासार शिरसी ता.निलंगा येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डी.एस.गावसाने यांचे अध्यक्षतेखाली दिनांक-05 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता कार्यशाळा आयोजित केलेली आहे.

            या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, माती परिक्षणाची गरज, जमिन आरोग्य पत्रिका वाचन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, जैविक खताचा वापर, रासायनिक खताचा कार्यक्षम वापर इत्यादी बाबत , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डी.एस. गावसाने टी.पी.शेनॉय, प्रमुख मार्गदर्शक ए.डी.एम. लातूर, विलास टाकणखार, सहयोगी प्राध्यापक, मृदा विज्ञान विभाग, कृषि महाविद्यालय,लातूर, अरुण गुट्टे, कृषि विद्यावेता वनामकृवि, परभणी, राजेंद्र काळे, तालूका कृषि अधिकारी,निलंगा हे कृषितज्ञ सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

            तरी लातूर जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर व ए.डी.एम ॲग्रो, लातूर यांनी केले आहे.           

तरी या कार्यशाळेस ऑनलाईन राहणेकरीता दयानंद माने यांचा मो.क्रमांक 9673336505 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

 

                                                  ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा