विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न       

 

 लातूर,दि.28(जिमाका) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे जैव-वैद्यकीय (Bio-Medical Waste Management) कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सूचनेनुसार सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संतोष मांगलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव सुर्यवंशी यांनी  या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

जैव-वैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण शास्त्रोक्त पध्दतीने कसे करावे व योग्य व्यवस्थापन केल्याने आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस तसेच रुग्णांना होणारी इजा व जंतूसंसर्ग रोखणे कसे शक्य आहे याबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच जैव- वैद्यकीय कचऱ्याची हाताळणी योग्य पध्दतीने करणे कायद्याच्या अनुषंगाने बंधनकारक असून त्यामूळे वायु व जलप्रदूषण रोखणे आवश्यक आहे, असे प्रशिक्षणा दरम्यान सांगण्यात आले.

या बाबत या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभाग निहाय डॉक्टर्स, परिचर्या, तंत्रज्ञ व वर्ग 04 कर्मचारी असे एकुण516 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बालाजी  पुरी, डॉ. वर्षा कलशेट्टी, निवासी डॉक्टर्स डॉ. प्रिया भारती, डॉ. आश्वीनी माने, डॉ. पिजुष मुजूमदार, कर्मचारी अझर शेख व श्री.मुजावर यांनी परिश्रम घेतले.

 





                                                            ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु