प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत 299 कोटी नुकसान भरपाई मंजूर
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत
299 कोटी नुकसान भरपाई मंजूर
लातूर,दि.13(जिमाका):- जिल्ह्यातील 4लाख 62 हजार 991 शेतकऱ्यानी प्रधानमंत्री कृषि विमा योजनेंतर्गत् ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज
केलेले होते. अशा अर्ज
केलेल्या शेतकऱ्यांचे
पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल विमा कंपनीने अंतिम करून, अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना रुपये 299 कोटी नुकसान भरपाई मंजूर केले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
खरीप 2021 मध्ये लातूर
जिल्ह्यातील 9 लाख 60 हजार 416 शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता. माहे सप्टेंबर-ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे
शेतामध्ये पाणी साठून उभ्या पिकाचे नुकसान झालेले होते.यासंदर्भात
विमा योजनेच्या तरतुदीनुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी झालेला नुकसानी
बाबत वैयक्तिक अर्ज करण्याबाबत कृषी विभागाने /विमा कंपनीने आवाहन केलेले होते.
सदर नुकसान भरपाईचे वाटपही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक
खात्यावर जमा करण्यात येत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना काही शंका/अडचणी असल्यास त्यांनी त्यांच्या तालुक्याच्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी
संपर्क साधून माहिती घ्यावी असे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी
आवाहन केलेले आहे.
***
Comments
Post a Comment