जिल्हाधिकारी कार्यालयात आल्पसंख्यांक दिन साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात
आल्पसंख्यांक दिन साजरा
लातूर,दि.20(जिमाका):- दि.१८
डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे सकाळी ठीक
११.०० वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक
हक्क दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी
यांनी पृथ्वीराज
बी.पी. दीपप्रज्वलन
करून केली. त्यानंतर सहायक जिल्हा
नियोजन अधिकारी वामन जाधव, यांनी अल्पसंख्याकाच्या कल्याणाकरिता जिल्ह्यामध्ये
राबविण्यात येणा-या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेवून
सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमास जिल्हा नियोजन
अधिकारी एम.एस.दुशिंग, उपजिल्हाधिकारी (सामान्य),गणेश महाडीक, जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे, नगरपालिका प्रशासन, महेश परंडेकर, तहसीलदार, एस.जी.कडेकर, लेखाधिकारी तसेच इतर
यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
शेवटी एस.जी.कडेकर, लेखाधिकारी
यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी
जफर कादरी (मनपा,लातूर), महेश कुलकर्णी, विशाल नेवासकर, संजय कलशेट्टी व श्रीमती मनिषा महिंद्रकर यांनी विशेष प्रयत्न केले.
****
Comments
Post a Comment