येत्या 23 जानेवारीपासून राबविण्यात येणारी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

येत्या 23 जानेवारीपासून राबविण्यात येणारी

पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करावी

                                       -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

लातूर,दि.31-(जिमाका) जगातून पोलिओचे निर्मुलन करणेसाठी सन 1995 पासून पल्स पोलिओ मोहिम राबविली जाते. यात नियमित लसीकरण, पोलिओ संक्षयीत रुग्णांची तपासणी करणे व पल्स पोलिओ मोहिम यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने 23 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यात सर्वत्र पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची बैठक 30 डिसेंबर 2021 रोजी आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

लातूर जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 569 हे 05 वर्षे वयोगटातील लाभार्थी असून एकूण 2 हजार 128 बूथचे नियेाजन केले आहे. यात 9 हजार 661 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून 430 पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे.तालूका निहाय जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करुन संनियंत्राची जबाबदारी  दिली. या मोहिमेत एकही लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी नियोजन करण्याची सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केल्या.

लातूर जिल्ह्यातील उसतोड ठिकाणी, विटभट्टया, स्थलांतरीत समुह, बांधकाम ठिकाणी लाभार्थीची आगावू नोंदणी करुन सर्व सनियंत्रण अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष देणेबाबत सूचीत करण्यात आले आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपाचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास, आयएमए च्या डॉ. काळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व सर्व तालुका आरोग्य अधिकरी, वैद्यकीय अधिक्षक व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु