नाताळ व नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 2 लाख 98 हजार 530 इतक्या रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त

 

नाताळ नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने

2 लाख 98 हजार 530 इतक्या रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त

लातूर, दि.29 (जिमाका) :-  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर तसेच स्टाफ यांनी गुन्हा क्र. 270/2021 अन्वये शिवाजी चौक, ढोकी-मुरुड रोड, ता. जि. लातूर या ठिकाणी दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये देशी मद्य 180 मिली  च्या 240 बाटल्या व देशी मद्य 90 मिलीच्या 1600 बाटल्या तसेच गुन्ह़यामध्ये वापरलेली एक चारचाकी कार इंडीगो क्र. MH-25-A-3339 असा एकूण 2,87,400/- रुपयांचा मुद्येमाल जप्त केला सदर गुन्ह़यात आरोपी श्रीधर सत्यानारायण गुलापल्ली , नरेश गौड रामागौड अली , नितीन रमेश दासाराम असे तीन आरोपींना अटक करुन मुंबई दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला तसेच याचबरोबरच रेणापुर तालुक्यात व लातूर येथील ग्रामीण भागात इतर 4 ठिकाणी अनुक्रमे हॉटेल अनिकेत ढाबा, खानापुर फाटा, हॉटेल रानवारा ढाबा, पांढरी, तसेच लातूर तालुक्यातील हॉटेल तुळजाभवानी ढाबा, मळवटी, हॉटेल ग्रीन पार्क ढाबा, चिंचोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकून एकूण देशी 202 लिटर,  विदेशी 6 लिटर जप्त केली व सदर गुन्ह़यांमध्ये एकूण 7 आरोपींना अटक करुन ढाबे चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत या सर्व कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूरच्या पथकाने एकूण 2 लाख 98 हजार 530 इतक्या रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी पुढील तपास निरीक्षक लातूर राहुल बांगर हे करत

आहेत.

या कारवाईमध्ये निरीक्षक राहुल बांगर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, निलेश गुणाले, जवान  अनिरुद्व देशपांडे, हनुमंत मुंडे, कपिल गोसावी यांनी सहभाग नोंदविला. अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार तसेच राज्य उत्पादन शुल्क, लातूर विभाग व पोलीस विभाग, लातूर यांच्यामार्फत रात्रीच्या गस्तीमध्ये ढाब्यावर बसून मद्यसेवनासाठी विनामद्यप्राशन परवाना जर कोणी मद्यप्राशन करतांना आढळल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचे तसेच अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 8422001133 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन  राज्य उत्पादन शुल्कचे  अधीक्षक गणेश बारगजे यांनी केले आहे.

 

                                                                          ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा