राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. शीतल भावसार “मेडिक्वीन एक्सलन्स” पुरस्काराने सन्मानित
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या
हस्ते डॉ. शीतल भावसार
“मेडिक्वीन एक्सलन्स” पुरस्काराने सन्मानित
लातूर,दि.7(जिमाका):- विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शीतल भावसार या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या
हस्ते महिला डॉक्टरांच्या उत्कृष्ट समाजकार्यासाठी राजभवन, मुंबई येथे “मेडिक्वीन एक्सलन्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.
महिलांच्या आरोग्यासाठी
कार्य करणाऱ्या मेडिक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन
करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मेडिक्वीनच्या संस्थापिका डॉ. प्रेरणा बेरी- कालेकर
गोवर्धन इको विलेजच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ. संध्यासुब्रमण्यन व मेडिक्वीनच्या
सचिव डॉ. प्राजक्ता शह उपस्थित होत्या.
मेडिक्वीन म्हणजे
महाराष्ट्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी असलेली आगळी-वेगळी सोंदर्यस्पर्धा ज्यामध्ये महिलांचे केवळ सौंदर्य, कला ,गुण, फिटनेसच
नव्हे तर त्यांनी केलेल्या महिला सक्ष्मीकरणासाठी इतर सामाजिक कार्याची दखल घेण्यात
येते. यापुर्वी मेडिक्वीन 2020 मध्ये डॉ.शीतल भावसार- अभंगे यांची Social
Work Round मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती.
डॉ. शीतल भावसार
यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान झाल्याने त्यांचा विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व वैद्यकीय अधिक्षक डॉ.
संतोषकुमार डोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शीतल भावसार- अभंगे
म्हणाल्या की, मी करत असलेल्या सामाजिक कार्यात माझे पती डॉ. राहुल अभंगे यांची मोलाची
साथ लाभते. तसेच माझी आई, मुली शर्वरी, कृष्णा यांचीही सतत साथ मिळते. त्यामुळेच हा
मानाचा पुरस्कार मिळण्यात त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉ. शीतल भावसार-अभंगे
यांच्यावर विभागप्रमुख, नातेवाईक, मित्र परिवाराकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment