नेहरु युवा मंडळानी विशेष युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेहरु युवा मंडळानी विशेष युवा
मंडळ
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर,दि.3(जिमाका):-केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत् कार्यरत
नेहरु युवा केंद्र लातूर मार्फत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, स्वयंरोजगार
पर्यावरण विकास, युवक विकास व राष्ट्रीय एकात्मता आदी क्षेत्रात वर्ष 2020-21 मध्ये
उल्लेखनीय कार्यक्रम करणाऱ्या नेहरु युवा मंडळाला विशेष युवा मंडळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या मंडळाला 25 हजार रुपये, राज्यपातळीवर
पात्र ठरलेल्या मंडळाला रु. 75 हजार, राष्ट्रीय पातळीवर पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम
रु. 3 लाख, व्दितीय रु. 1 लाख व तृतिय रु. 50 हजार पुरसकार जाहीर करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी दिनांक 15 डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज नेहरु युवा केंद्र लातूर
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लातूर येथे दाखल करावेत. अधिक माहितीसाठी 02382-295598 या
क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
Comments
Post a Comment